
राज्यघटनेतील (संविधान) भाग 5, कलम 52,प्रकरण 1 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधीत आहे.
राष्ट्रपतीची पात्रता
* कलम 58 नुसार -
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. वयाची 35 वर्षे पूर्ण असावी.
3. तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
4. तो भारत सरकार किंवा राज्यसरकार मधील किंवा यांच्या नियंत्रणाखाली किंवा केंद्र आणि राज्यशासनाचे मंत्री याला अपवाद आहेत.
5. राष्ट्रपतीसाठी आवेदन भरतांना किमान 50 मतदात्यांचा पाठिंबा व 50 मतदात्यांचे अनुमोदन देणे गरजेचे आहे. तसेच RBI मध्ये रु.१५००० अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.उमेदवारास एकूण मताच्या 1/6 मते न मिळाल्यास ही रक्कम जप्त होते.
राष्ट्रपतीची निवडणूक :
2. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभेतील निर्वाचित सदस्य तसेच राज्याती विधानसभेच्या निर्वाचित (निवडून आलेले) सदस्य भाग घेतात. (दिल्ली, पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाच विधानसभेचे निर्वाचित सदस्य सुद्धा 70 वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भ घेतात, जम्मुकश्मीर या केंद्र शासित प्रदेशाच्या विधान सभेचे सदस्य सुध्दा राष्ट्रपतीच्या निवडणुक भाग घेतात) (विधानपरिषदेचे सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही.)
MPSC राज्यसेवा Syllabus Descriptive Pattern
राष्ट्रपतीची निवडणुक विवाद:
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद विवाद निर्माण झाल्यास अंतिम व केवळ निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. यावर कोठेही अपील करता येत नाही.
निवडणुकीत भाग घेणारे सदस्य अपूर्ण होते किंवा पद रिक्त होते या कारणावरुन निवडणुकीला आव्हान देता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरवल्यास त्याने केलेले कार्य रद्द होत नाही ती कायम राहते.
राष्ट्रपतीचा कार्यकाल:
• शपय घेतल्याच्या तारखेपासून पाच वर्षे. परंतु राजीनामा दिल्यास, मृत्यू आल्यास किंवा इतर कारणाने पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कामकाज पाहतात/करतात.
•राष्ट्रपतीने आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला द्यायचा असतो असे लोकसभेच्या अध्यक्षाला कळविणे आवश्यक असते.
•राष्ट्रपतीचा कालावधी संपला तरीही जोपर्यंत नवीन व्यक्ती। पद ग्रहण करत नाही तोपर्यत आधीचाच राष्ट्रपती कामकाज पाहतो.
• भारतात एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती/होऊ शकतो.
• राष्ट्रपतीला पदावरुन दूर करण्यासाठी कलम 61 नुसार महाभियोग चालवावा लागतो.
महाभियोग (कलम 61)
घटनेच्या कलम 61 नुसार राष्ट्रपतीने घटना भंग केल्यास राष्ट्रपतीला पदावरुन दूर करण्यासाठी
1. संसदेचे दोन्ही सभागृह भाग घेतात.
2. दोन्ही सभागृहातील निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य महाभियोगामध्ये भाग घेतात.
3. महाभियोगाची मागणी दोनपैकी कोणतेही सभाग्रुह करू शकते.
4. ज्या सभागृहाने मागणी केली त्या सभागृहातील 1/4 म्हणजे (25%) सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी मागणी 14 दिवस आधी सभागृहात मांडावी लागते.
5. त्यानंतर असा ठराव त्या सभागृहाने एकूण सदस्य संख्येच्या 2/3 (66%) बहुमताने पारित करणे गरजेचे आहे.
6. असा ठराव दुसऱ्या सभागृहाकडे आल्याबरोबर दुसरे सभागृह स्वतः राष्ट्रपतीवरील घटनाभंगाच्या दोषारोपाची चौकशी करेल अथवा ते काम न्यायालयाकडे अथवा सभागृहाने नेमलेल्या आयोगाकडे सोपविता येईल. त्यामध्ये राष्ट्रपतीदोषी आढळल्यास त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने ठराव पारित केल्याच्या दिनांक तेव्हापासून राष्ट्रपती पद रिक्त होईल.
7. राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रियेत राज्यांच्या विधानसभा भाग घेत नाही.
8. आतापर्यंत एकही राष्ट्रपतीवर महाभियोग चाललेला नाही.
9. महाभियोग ही अर्धन्यायिक प्रक्रीया आहे.
(Polity Part 4) Notes With Rushi
राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास
खालील कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त होते.
1. कार्यकाल संपल्यामुळे
2. राजीनामा दिल्यास
3. मृत्यू झाल्यास
4. महाभियोग प्रक्रियेद्वारे
5. न्यायालयाने निवडणूक अवैध व राष्ट्रपतीला अपात्र ठरवल्यास (लाभाचे पट
6. जर उपराष्ट्रपती सुद्धा गैरहजर असतील तर र राष्ट्रपतीचे पद कधीही रिक्न होत नाही. सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद सांभाळतील आणि
7. या व्यतिरिक्त इंतर कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचा कार्यकाल पाहतील.
8. उपराष्ट्रपती नसल्यास सर्वाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाबीश ते ही नसल्यास इतर न्यायाधीशापैकी ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपतीचा कार्यकाळ सौभाळतील.
9. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये किंवा इतर कारणामुळे व आपली कार्य करण्यास असमर्थ असेल तर उपराष्ट्रपती कार्यभार पाहतील,
10. कोणत्याही परिस्थितीत उपराष्ट्रपती किंवा इतर न्यायाधीश राष्ट्रपतीची कार्य पार पाडत असल्यास त्यांना राष्ट्रपतीचे होतात. सर्व अधिकार, पगार व भत्ते, विशेषाधिकार तसेच संरक्षण बाबतचे अधिकार प्राप्त होतात.
राष्ट्रपतींची शपथ
शपथ: सरन्यायाधीश समोर किंवा त्यांच्या अनुपस्थित इतर न्यायाधीशांपैकी ज्येष्ठ न्यायाधीशा समोर.
राजीनामा: राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतील.
पगार: 5,00,000 रु. महिना.
राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य
1. कार्यकारी अधिकार-
a. भारताचा कार्यभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो.
b. केंद्रशासित प्रदेशातील शासन चालविण्यासाठी नियम तयार करु शकतात.
c. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात व त्यांच्या सल्ल्यांनी इतर मंत्र्यांची नेमणूक करतात.
d. राष्ट्रपती महान्यायवादीची नेमणुक करुन पगार व भत्ते ठरवितात.
e. राष्ट्रपती पुढील नेमणुका करतात -
1. महालेखापाल (कलम 148) (CAG)
2. मुख्य निवडणूक आयुक्त व दोन इतर आयुक्त (कलम 324)
3. UPSC चे अध्यक्ष व सदस्य (कलम 315)
4. वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य (280)
5. राज्यपाल व नायब राज्यपाल (कलम 1.53)
6. तिन्ही दलाचे सेनापती व अन्य प्रमुख अधिकारी
7. अनुसुचित जाती व जमाती आयोग, मागासवर्गीय आयोग, आंतरराज्यीय
परीषद. 8. उच्च व सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायाधीशांच्या नेमणूका (124 - 2)
9. तिन्ही दलाचे सरसेनापती या नात्याने युद्ध, शांतता विषयक तह करण्याचा अधिकार.
10. राष्ट्रप्रमुख म्हणून परदेशी राजदूत, इतर देशाचे राष्ट्रप्रमुख, आंतरराष्ट्रीय परिषदात सहभागी होणे व अन्य राष्ट्रांशी करार करणे हे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत.
11. पंतप्रधानाकडून केंद्र शासनाच्या कामाचा आढावा घेणे तसेच एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मंत्रीमंडळाच्या विचारार्थक ठेवणेबाबत पंतप्रधानाला भाग पाडू शकतात.
भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती
- डॉ. राजेंद्रप्रसाद
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
- डॉ. झाकिर हुसेन
- डॉ.व्ही.व्ही. गिरी (हंगामी)
- न्यायमूर्ती महम्मद हिदायतुल्लाह
- डॉ.व्ही.व्ही.गिरी
- फकरुद्दीन अली अहमद
- पी डी चली(हंगामी)
- नीलम संजीव रेड्डी
- ज्ञानी झेलसिंग
- रामास्वामी व्यंकटरमण
- डॉ. शंकरदयाल शर्मा
- के. आर. नारायणन
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
- प्रतिभाताई पाटील
- प्रणब मुखर्जी
- रामनाथ कोविद
- द्रोपती मुर्म
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
जर तुम्हाला हे आवडले तर आम्हाला follow करा आणि अश्याच महत्वपूर्ण अपडेट्स मिळवत रहा आणि आपले ज्ञान वाढवत रहा.
Ask what you want