परराष्ट्र धोरण
सर्वभौम राष्ट्र -
बाह्य नियंत्रण नसतानाही संपूर्णपणे सर्वोत्कृष्ट , आपले कारभार देशांना सर्वभौम राष्ट्र म्हणतात.
परस्परावलंबन -
जगातील कोणतेच राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. गरीब,श्रीमंत,तसेच विकसित,विकसनशील असे सर्वच देश एकमेकांवर वेगवेगळ्या कारणांसाठी अवलंबून असतात. याला परस्परावलंबन म्हणतात.
राष्ट्रीय हित -
आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे जतन करणे,आर्थिक विकासाला प्राधान्य देणे, परराष्ट्रसंबंधातील आपले हित जपणे याला राष्ट्रीय हित असे म्हणतात.
परराष्ट्र धोरण -
परराष्ट्र धोरण म्हणजे राष्ट्रहिताच्या जोपासणेसाठी व संवर्धनासाठी अन्य राष्ट्रांशी करायच्या व्यवहारांविषयीची धोरण होय.
परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक -
भौगोलिक स्थान,लोकसंख्या, लष्करी सामर्थ्य, अर्थव्यवस्था.
(भारताचे परराष्ट्र धोरण) -
भारताचे परराष्ट्र धोरण पार्श्वभूमी - भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग हे जणू एक कुटुंबच आहे, ही शिकवण आपल्या परराष्ट्र धोरणात व्यक्त होते. भारताच्या स्वतंत्र लढ्यातून पुढे आलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता व सामंजस्य यांचाही प्रभाव आपल्या परराष्ट्र धोरणावर आहे.
७ सप्टेंबर १९४६ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांनी हंगामी सरकारचे प्रमुख या नात्याने केलेल्या भाषणात भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे स्पष्टपणे मांडली होती.अन्य राष्ट्रांच्या दबावाला बळी न पडता सतंत्र परराष्ट्र धोरण आखण्यावर त्यांनी भर दिला.
भारताचे परराष्ट्र धोरण-
संविधानातील तरतूद : भारताच्या संविधानात आपले परराष्ट्र धोरण कसे असावे,याचे मार्गदर्शन अनुच्छेद ५१ नुसार करण्यात आले आहे. या अनुच्छेदामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे दिली आहेत.आपल्या परराष्ट्र धोरणातून पुढील बाबी साध्य करायच्या आहेत.
१)भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.
२)राष्ट्रराष्ट्रांत न्याय्य व सन्मानाचे संबंध प्रस्थापित करावे.
३) आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करावा.
४)आपले आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेने व लावदामार्फत सोडवण्यास प्रोत्साहन द्यावे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची काही ठळक वैशिष्ट्ये खालीप्रमाणे-
•साम्राज्यवाद व वसाहत वादास विरोध
•आंतरराष्ट्रीय शांततेची जोपासना
•इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे
पंचशील तत्वे-
पंचशील तत्वे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ होय. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे १९५४ साली अधिकृतपणे मांडली.त्यातील पाच तत्वे पुढीलप्रमाणे -
१) एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे.
२) अन्य देशांवर आक्रमण न करणे.
३)अन्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करणे.
४)समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण स्वीकारणे.
५) शांततामय सहजीवन.
अलिप्ततावाद -
दुसऱ्या महयुद्धानंतरच्या काळात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उदायास आल्या.त्यांच्यातील तणावपूर्ण संबंधाला ' शीतयुद्ध ' म्हटले जाते. सोव्हिएत युनियन व अमेरिका हे दोन देश नव्याने स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करत होते.भारत अशा कोणत्याच गटात सामील होणार नव्हता,कारण भारताला कोणाचेही प्रभुत्व नको होते, पण सर्वांचे सहकार्य पाहिजे अशी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरु यांनी घेतली. शीतयुद्धाच्या संदर्भात भारताने घेतलेल्या या भूमिकेला ' अलिप्ततेचे धोरण ' असे म्हणतात. अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणखी एक वैशिष्टय उल्लेखनीय आहे.
अलिप्ततावादी चळवळ -
दुसऱ्या महाुद्धानंतरच्या काळात आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या धोरणाला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली.
अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद,साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला आहे. आंतरराषट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास या चळवळीने भर दिला.पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्व कमी झाले नाही.
मानवतावाद,जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे.या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास मदत केली. तसेच अशा राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला.
आणखी वाचा ( भारताची सुरक्षा व्यवस्था )
( संयुक्त राष्ट्रे )

Ask what you want