राष्ट्रांमध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतात, तेव्हा त्या राष्ट्रांच्या भौगोलिक अखंडतेला व सार्वभौमत्वाला धोके निर्माण होतात.राष्ट्रांमधील संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले नाही,तर त्यातून युद्धाचाही धोका निर्माण होऊ शकतो,म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाचे, ऐक्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते.त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सेनादले सुसज्ज ठेवावी लागतात. सेनादलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले तयार ठेवावी लागतात.देशाचे संरक्षण करणारी यंत्रणा व व्यवस्था अद्ययावत असावी लागते.राष्ट्राची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या या उपाययोजनांना ' राष्ट्रीय सुरक्षा ' म्हणतात.
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप:
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत सेनादलांचा आणि संबंधित संस्थांचा समावेश होतो.भूदल,नौदल आणि वायुदल या तीन दलांचेईलून भारतीय लष्कर तयार होते.या तिन्ही सेनादलांची मुख्यालये नवी दिल्ली येथे आहेत.
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे राष्ट्रपती असतात.राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलांचे सरसेनापती असतात . पंतप्रधान मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने आपले संरक्षण विषयक धोरण ठरवतात.
संरक्षण हा विषय संघसूचीत असल्याने संघशासनाला संरक्षणविषयक बाबींमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो.संघशासणाचे संरक्षण खाते संरक्षणाशी निगडित सर्व कामे करते.या खात्याच्या प्रमुखाला ' संरक्षण मंत्री ' म्हणतात.
राजकीय व्यवहार समिती, राष्ट्रीय सुरक्षा समिती,राष्ट्रीय सुरक्षा परिषद या तीन यंत्रणा शासनाला संरक्षणविषयक बाबींमध्ये निर्णय घेण्यास मदत करतात.
भूदल: भारतीय सीमांचे रक्षण करणे हे भुदलचे प्रमुख काम आहे.
नौदल: भारताला सुमारे ७५ १७ किलोमीटर लांबीचा सुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे.
वायुदल:भारताच्या हवाई सीमांचे रक्षण वायुदल करते.
या तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
प्रशिक्षण संस्था: भारताची सुरक्षा भक्कम करण्यासाठी जवानांना प्रशिक्षण दिले जाते.यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. संरक्षणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी प्रशिक्षण काळात मिळते.भारतीय लष्करात आता महिलांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
National Defence academy,, Indian Military Academy, National Defence College या काही प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत.
निमलष्करी दले: यात (BSF),CRPF,RAF,Coast guard यांचा समावेश होतो.
गृहरक्षक दल: स्वातंत्र्यपूर्व काळात ही संस्था स्थापन करण्यात आली.वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही नागरिकांना या दलात सहभागी होता येते.
पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे,दंगल व बंद याकाळात दूध,पाणी इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे,वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर,अशा आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करण्याचे काम हे दल (Home Guard) करते.
नागरिक आणि संरक्षण: नागरिकांच्या मनोधैर्यावर व सहकार्यावर सैन्याचे सामर्थ्य अवलंबून असते.नागरिक सैन्याला पाठबळ देऊ शकतात.देशाचे रक्षण करणे हे आपले एक मूलभूत कर्तव्य आहे.
भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने: स्वातंत्र्योत्तर काळात बाह्य शक्तींनी भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानसोबत भारताचे १९४७-४८, १९६५, १९७१ ,१९९८, मध्ये युद्धाचे प्रसंग निर्माण झाले. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. आजही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावपूर्ण संबंध आहेत.
दहशतवाद हे भारताच्या सुरक्षेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.याचे उच्चाटन व्हावे यासाठी आपला देश प्रयत्न करीत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात भारताचा पाठिंबा आहे.
आपल्या देशात निरनिराळ्या धर्माचे,जातीचे लोक राहतात.आपल्या देशात विविधतेत एकता आहे.आपल्या एकात्मतेचे जतन व्हावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

Ask what you want