MPSC Polity
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महयुद्धे झाली.यामुळे मानवजातीचे फार मोठे नुकसान झाले.यामुळे झालेली वित्तहानी व मनुष्यहानी लक्षात घेता सर्वांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत असे वाटू लागले.पहिल्या महायुद्धानंतर स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाला शांतता प्रस्थापित करण्यात यश आले नाही,पण दुसऱ्या महायद्धानंतर अशी अशी युद्धे थांबली पाहिजेत असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले.म्हणून ' संयुक्त राष्ट्रे ' ही संघटना २४ऑक्टोबर १९४५ साली स्थापन झाली.२४ ऑक्टोबर हा दिवस ' संयुक्त राष्ट्र दिन ' म्हणून साजरा केला जातो. जागतिक शांतता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्न करते.
संयुक्त राष्ट्रांची सनद ज्यांना मान्य आहे अशा सर्वच राष्ट्रांना संयुक्त राष्ट्रांचे सभासद होता येते.
उद्दिष्टे:
(१) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वृध्दींगत करणे.
(२) रष्ट्राराष्ट्रात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
(३)सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेने सोडवणे.
(४)मानवी हक्कांचे स्वातंत्र्याचे जातं व संवर्धन करणे.
संयुक्त राष्ट्रांचे घटक:
(१) आमसभा (२) सुरक्षा परिषद (३) सचिवालय (४) आंतरराष्ट्रीय न्यायालय (५)आर्थिक व सामाजिक परिषद (६)विश्वस्त मंडळ
संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे.येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय वगळता इतर सर्व घटकांची मुख्य कार्यालये आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय नेदरलँड्स मधील ' द हेग ' या शहरात आहे.
संयुक्त रष्ट्रांचे कार्य
(१) शांततामय मार्ग : संयुक्त राष्ट्रांचा शांततामय मार्गाने प्रश्न सोडविण्यावर भर असतो.राष्ट्रांनी आपले वाद शांततेने, मध्यस्थीने सोडविण्यावर संयुक्त राष्ट्रांचा भर असतो.
(२)प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग : शांततेने प्रश्न ना सुटल्यास संयुक्त राष्ट्रे प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग अवलंबतात.यांत आक्रमक राष्ट्रविरुद्ध आपल्या सदस्य राष्ट्रांच्या शांतीसेनेचा वापर केला जातो.संयुक्त राष्ट्रांची ही कारवाई मानवतावादी भूमिकेतून केली जाते.असा मानवतावादी हस्तक्षेप करून संयुक्त राष्ट्रांनी कोरिया,कांगो, सोमालिया इत्यादी राष्ट्रांशी संबंधित प्रश्न सोवण्याचा प्रयत्न केला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण रक्षण,बालकांचे हक्क, सबलीकरण इत्यादी क्षेत्रांत मोलाची कामगिरी केली आहे.
संयुक्त राष्ट्रे व पर्यावरणाची समस्या:१९७२ मध्ये स्टॉकहोम येथे एक परिषद भरवण्यात आली त्यात या संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित झाला.१९७२ मध्ये वसुंधरा परिषदेचे आयोजन हा पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांतील एक महत्वाचा टप्पा होता.जागतिक तापमान वाढ, ओझोन थर विरळ होणे,वनांचे व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन,प्रदूषण नियंत्रण इत्यादी प्रश्नांवर या परिषदेत चर्चा केली गेली.
संयुक्त राष्ट्रे व महिला सबलीकरण: संयुक्त राष्ट्रांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी व स्त्री-पुरूष समतेसाठी पाठिंबा दर्शवला आहे.संयुक्त राष्ट्रांनी ८ मार्च हा दिवस ' जागतिक महिला दिन ' म्हणून घोषित केला.१९७५ हे ' महिला वर्ष ' म्हणून घोषित केले. १९७६-१९८५ हे संपूर्ण दशक महिलांसाठीचे दशक म्हणून घोषित केले.
भारताचा सहभाग :
भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य आहे.संघटनेची सर्व ध्येये व उद्दिष्टे भारताने स्वीकारली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्यात भारताचा महत्वपूर्ण सहभाग आहे.भारताने सोमालिया देशात शांतीसेनेद्वारे विहीरी खणने, पाणीपुरवठा करणे, शाळा चालवणे इत्यादी कामे केली आहेत.भारतीय शंतीसेनेचे हे अभिमानास्पद काम आहे.
निःशस्त्रिकरण :
देशाची उन्नती कायम राखणे महत्त्वाचे असते.त्यासाठी निःशस्त्रिकरण हे महत्वाचे असते.
काही राष्ट्रे शस्त्रस्पर्धा वाढवण्यावर भर देतात.त्यामुळे राष्ट्रांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होते.शस्त्रे नष्ट केली,त्यांचे उत्पादन थांबवले,तर जगात शांतता प्रस्थापित होऊ शकेल हा विचार म्हणजे ' निःशस्त्रिकरण ' .१९५९ साली संयुक्त राष्ट्रांनी निःशस्त्रिकरण हे आपले ध्येय मानले.
भारताचे निःशस्त्रिकरण धोरण :
भारताने यास पाठिंबा दिला असून त्यास नेहमीच प्रतिसाद दिला आहे.आण्विक शस्त्रांचा वापर प्रथम करणार नाही ,हे भारताच्या आण्विक धोरणाचे महत्वाचे तत्व आहे.
आणखी वाचा (भारताची सुरक्षा व्यवस्था)

Ask what you want