[महात्मा ज्योतिबा फुले]

- नाव - ज्योतिबा गोविंदराव गोऱ्हे(फुले)
- जन्म -११ एप्रिल १८२७
- जन्म गाव - धनकवडी,पुणे
- मुळगाव - कटगुन, तालुका - खटाव, जि. सातारा
- आईचे नाव - चिमणाबाई,१८२८: आईचा मृत्यू (संगोपन - सगुणाबाई क्षीरसागर)
- शेरीबा (फुलेंचे आजोबा) यांना माधवराव पेशवाकडून ३५ एकर जमीन बक्षीस म्हणून मिळाली
- त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांचे नाव फुले पडले.
- १८३४-३८: प्राथमिक शिक्षण पुणे येथे पंतोजी च्या शाळेत
- १८४० विवाह: सावित्रीबाई सोबत.(खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या, सातारा)
- १८४१-४७: पुण्यातील स्कॉटिश मिशनाऱ्यांच्या शाळेत माध्यमिक शिक्षण
- १८४७: लहुजी साळवे यांच्या कडून मैदानी खेळाचे प्रशिक्षण (कुस्ती,नेमबाजी, व दांडपट्टा)
- थॉमस पेन यांच्या Rights of Man या पुस्तकाचा प्रभाव पडला याच काळात संत तुकाराम महाराज,शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर यांचे जीवन चरित्र वाचून अन्यायाविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळाली.
- ३ ऑगस्ट १८४८: पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा काढली.(पहिल्या दिवशी फक्त ८ मुली उपस्थित होत्या)
- ३ जुलै १८५१: बुधावरपेठेत अप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा काढली.
- १७ सप्टेंबर१८५१: रास्तापेठ येथे मुलींची शाळा काढली.[अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ येथे काढली]
- १५ मार्च १८५२: वेताळपेठ येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढली (दलीत शिक्षक - धुरजी चांभार,गणू मांग)[पुणा ग्रंथालयाची स्थापना]
- १६ नोव्हेबर १८५२: विश्रामबाग येथे सत्कार मेजर थॉमस क्यांडि यांनी केला.(शाल, sreefal-२००₹)
- १० सप्टेंबर १८५३: महार,मांग यांच्या शिक्षणासाठी मंडळी नावाची संस्था स्थापन केली.
- 1876-1882 : पुणे नगर परिषदेचे सदस्य,
- 1876 : पुणा कमर्शिअल अॅन्ड कॉन्ट्रकटिंग कंपनी स्थापन केली (खडकवासला तलाव व कात्रज घाट बांधला.) (कंपनी स्थापन करण्यासाठी मदत - हरी शिंदे, कृष्णराव भालेकर)
- • 1 जानेवारी 1877 दिनबंधु साप्ताहिक सुरु केले. (पुण्याचे संपादक - कृष्णराव भालेकर) (मुंबईचे - नारायण मेघाजी लोखंडे).
- [धनकवाडी पुणे येथे व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली]
- १८८०: बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशनची स्थापना. भारतातील पहिली मजूर संघटना, नारायण लोखंडे (कामगारांचे पितामह) रविवारची भुरटरी मेघाजी
- 19 ऑक्टोंबर 1882 : शिक्षणासाठी नेमलेल्या हंटर कमिशन समोर शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. साक्ष दिली.(१२ वर्षाखालील मुलेमुली)
- 1882 : लोकमान्य टिळक व आगरकर यांची रावबहादूर बर्वे प्रकरणातून डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर सत्कार केला.
- 1884 : सत्यशोधक समाजाच्या विवाह पध्दतीला न्यायालयाची मान्यता.
- 2मार्च 1888: महाराणी व्हिक्टोरियाचा राजपुत्र ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या पुणे येथील सत्कार सभेत शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित.
- 11 में 1888: महात्मा ही पदवी मुंबईच्या जनते मार्फत रावबहादूर वडेकर यांच्या पुढाकाराने देण्यात आली.
- 1889: "जोपर्यंत काँग्रेस मध्ये सर्व जाती धर्माला, शेतक-यांना सामावुन घेतले जाणार नाही, तोपर्यंत कॉग्रेसने स्वतःला राष्ट्रीय कांग्रेस म्हणू नये असे म. फुलेंनी ठणकावून सांगितले. थोडक्यात राष्ट्रीय (नॅशनल) या शब्दाला विरोध होता.
- २८ नोव्हेंबर 1890: पुणे येथे मृत्यू, (दत्तक पुत्र यंशवतला मुखअग्नी देण्यास विरोध, सावित्रीबाईनी मुखअग्नी दिली.)
- म. फुलेंच्या ब्राम्हण मित्रांची नावे माधव वाळवेकर, सदाशिव पराजंपे, सदाशिव गाँवडे.
- ग्रंथसंपदाः-
1) तृतीय रत्न- 1855, मराठीतील पहिले सामाजिक नाटक, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. पहिला डोळा - पाणी, दुसरा डोळा- अन्न.
2) ब्राम्हणाचे कसब - 1869, प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी केली. (या ग्रंथात कुणबी, महार, मांग व माळी या जातीबददल यांनी वर्णन केले आहे.)
3) इशारा -१८८५,संसार - १८८५
4)शेतकऱ्याचा आसूड - १८८३
म. फुलेंबाबत मते=
- महाराषट्राचे मार्टिन ल्युथर - राजश्री शाहू महाराज
- दलीत उद्धारक - वि.रा. शिंदे
- हिंदुस्थानचा वॉशिंगटन - सयाजीराव गायकवाड
- आधुनिक भारताचा पहिला समाज क्रांतिकारक - वी. दा. सावरकर.
Ask what you want